शस्त्रांच्या प्रतिकृतीतून इतिहास पोहचविण्याचा प्रयत्न - नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 May 2019

वैभववाडी - महाराणा प्रतापसिंह आणि त्यांच्या सैन्याने इतिहास घडविताना कोणकोणती शस्त्रे, साधने वापरली हे तरूण पिढीला माहीती होणे आवश्‍यक आहे. शस्त्रांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातुन पुढच्या पिढीपर्यत इतिहास पोहचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

वैभववाडी - महाराणा प्रतापसिंह आणि त्यांच्या सैन्याने इतिहास घडविताना कोणकोणती शस्त्रे, साधने वापरली हे तरूण पिढीला माहीती होणे आवश्‍यक आहे. शस्त्रांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातुन पुढच्या पिढीपर्यत इतिहास पोहचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीने उभारलेल्या महाराणा प्रतापसिंह कलादालनात महाराणां आणि त्यांच्या सैन्याने युध्दात वापरलेल्या शस्त्रांच्या प्रतिकृतीची स्थापन करण्यात आली. या शस्त्रांचे पुजन आमदार राणे यांच्या हस्ते आज महाराणाच्या 479 व्या जयंतीनिमीत्त झाले.

आमदार राणे म्हणाले, ""महाराणा प्रतापसिंह आणि त्यांच्या सैन्याने कोणकोणती शस्त्रे वापरून इतिहास घडविला हे विद्यार्थी आणि तरूण पिढीला कळायला हवे. त्यामुळेच त्यांनी वापरलेल्या शस्त्रांच्या प्रतिकृती कलादालनात बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रतिकृती जयपुरहुन आणलेल्या आहेत. इतिहास माहीती व्हावी, यासाठीच हा प्रयत्न आहे.''

राजपुत शस्त्रे
भुज तलवार, कुऱ्हाडी, गज तलवार, भाला, ढाल, छुरी, वाघनखे, लहान कट्यार, मोठी कट्यार अशा प्रकारच्या विविध शस्त्रांची स्थापन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष दीपा गजोबार, क्षत्रीय राजपुत समाज कोकण विभागाचे भगवतसिंह चुंडावत, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, रवींद्र रावराणे, रोहन रावराणे, संतोष पवार, दिलीप रावराणे, तुळसीदास रावराणे, प्रकाश राणे, प्रकाश पाटील, दीपक गजोबार, संताजी रावराणे, प्राची तावडे, श्‍वेता पोवळे, स्वाती सांवत, अनिश सोनावणे, सचिन सांवत, रवींद्र तांबे, आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane comment on Maharana Pratapsingh Art gallery