esakal | चुकीच्या धोरणामुळे करूळ घाट खचला, 26 जुलैपर्यंत थांबणार नाही; राणेंचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

'चुकीच्या धोरणामुळे करूळ घाट खचला, 26 जुलैपर्यंत थांबणार नाही'

'चुकीच्या धोरणामुळे करूळ घाट खचला, 26 जुलैपर्यंत थांबणार नाही'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वैभववाडी : चुकीच्या धोरणामुळे करूळ घाटरस्त्याची दुरावस्था झाली आहे. गटारातील गाळ न काढल्यामुळेच करूळ घाटरस्ता खचला आहे. या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे. या घाटाची दुरूस्ती तत्काळ करून वाहतुक सुरू करा. २६ जुलैपर्यंत आपण थांबणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी अधिकाऱ्यांना देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मुसळधार पावसामुळे रविवारी (११) पहाटे करूळ घाटरस्ता (karul) खचला. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने हा घाटरस्ता २६ जुलैपर्यंत वाहतुकीस बंद केला आहे. या घाटरस्त्याची पाहणी आमदार नितेश राणे यांनी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग (national highway) प्रधिकरणचे उपअभियंता ओटवणेकर, उपसभापती अरविंद रावराणे, नासीर काझीभालचंद्र साठे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसिलदार ए. के. नाईक, शेरफुद्दीन बोबडे, संताजी रावराणे, अंकित सावंत, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'

आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. घाटरस्ता खचण्याला प्रशासन जबाबदार आहे. वेळेत जर गटारातील गाळ काढला असता तर हे प्रकार घडले नसते. ठेकेदारांची बिले झोपेत काढता का? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. खचलेल्या घाटरस्त्याची दुरूस्ती तातडीने व्हायला हवी. मी २६ जुलैपर्यंत थांबणार नाही. दिवसरात्र काम करा; परंतु हा रस्ता तत्काळ सुरू होणे आवश्यक आहे. पर्यायी वाहतूक जरी भुईबावडा घाटरस्त्याने होणार असली तरी त्या घाटरस्त्याने अवजड वाहतुक करणे धोकादायक आहे. प्रशासनाला मदत करायला आम्ही तयार आहोत. मंत्री, जिल्हाधिकारी कुणाशी बोलायचे असेल तर मला सांगा त्यांच्याशी मी बोलतो; परंतु दुरूस्तीचे काम लवकर पुर्ण व्हायलाच पाहीजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

loading image