esakal | 'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'

'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : शिवसैनिकांनो, शिवसेनेचे (shivsena) शिवसंपर्क अभियान बारा दिवसांत जोमात राबवून जे तुम्हाला छळतात त्यांचे निवडणुकीत बारा वाजविण्यास सज्ज व्हा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज येथे केले. कोकणातून (kokan) कोणी पंतप्रधान (Prime Minister) झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही. इतकेच काय तर चार नव्हे चाळीस मंत्री झाले तरी हरकत नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेनेतर्फे आयोजित शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते. या वेळी श्री. सामंत यांच्या हस्ते गोकुळच्या (gokul) संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व मुरलीधर जाधव, सामाजिक कार्याबद्दल हर्षल सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसैनिकांना शपथ देऊन अभियानासही सुरवात झाली. शासकीय विश्रामगृह येथे मेळावा झाला.

हेही वाचा: बळीराजा सुखावणार! राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

यावेळी सामंत म्हणाले, "शिवसेनेचे वेगळेपण जगाने स्विकारलेले आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेक्षणात देशातील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasahen thackeray) यांची नोंद झाली. तोच इतिहास उद्धव ठाकरे यांचा आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. त्यामुळेच शिवसेना व नेत्यांची बदनामीचे षडयंत्र आखले जात आहे. याउलट मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी घराघरात आदर आहे. परिणामी कोणी कितीही शंखध्वनी केला तरी फरक पडत नाही."

loading image