भाजप प्रवेशानंतर नीतेश राणे म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नीतेश राणे यांनी संपूर्ण कोकण भाजपमय करणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. तर स्वाभिमान पक्षाचे विलीकरणाबाबत नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून निर्णय घेतील, असे नीतेश राणे म्हणाले.

कणकवली - माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अजूनही अनिश्‍चित असला तरी त्यांचे पूत्र आणि नीतेश राणे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप कार्यालयात येऊन पक्षसदस्यत्वाचा अर्ज भरला. त्यानंतर त्यांचा रीतसर भाजप प्रवेश झाल्याची घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केली. नीतेश राणे उद्या (ता. 4) सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्याचवेळी त्यांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपचा एबीफॉर्म देण्यात येईल, अशी माहिती श्री. जठार यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती नीतेश राणे यांनी दिली.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नीतेश राणे यांनी संपूर्ण कोकण भाजपमय करणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. तर स्वाभिमान पक्षाचे विलीकरणाबाबत नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसून निर्णय घेतील, असे नीतेश राणे म्हणाले.

याखेरीज नाणार प्रकल्पाबाबतची भूमिका आपण पुढील काही दिवसांत स्पष्ट करू असेही ते म्हणाले. सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी बंडखोरी केली आहे. मात्र येत्या 7 तारीखपर्यंत ही बंडखोरी प्रदेशपातळीवर शमविण्यात येईल, अशी माहिती श्री. जठार यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitesh Rane enters in BJP