esakal | ..त्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही ;  नितेश राणेंनी पुढे आणले आहे धक्कादाय सत्य
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane speech in press conference in kankavli

 याबाबात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आपण त्या प्रकाराबाबत चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

..त्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही ;  नितेश राणेंनी पुढे आणले आहे धक्कादाय सत्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली - जिल्हा रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये कार्यरत असलेली परिचारिका पॉझिटिव्ह निघाली आहे. तीला संशयित रूग्ण असतानाही ड्युटी देण्यात आली. हा प्रकार धक्कादायक असून जिल्हा आरोग्य प्रशासन लोकांच्या आयुष्याशी खेळत आहे. या प्रकाराची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सकांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

 याबाबात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आपण त्या प्रकाराबाबत चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना राणे म्हणाले, “जिल्हा रुग्णालयात घडलेला प्रकार हा धक्कादायक आहे. संबंधित परिचारिका संशयित रूग्ण होती. तीचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. यानंतर तीला क्वारंटाईन करणे आवश्यक होते; मात्र तिला कोणतीही विश्रांती न देता लहान मुलांच्या वार्डमध्ये काम दिले. लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या आयुष्यावर खेळणारा हा प्रकार गंभीर आहे. याची दखल घ्यावी, असे लेखीपत्र आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविण्यात आले आहे.”

हे पण वाचा - धक्कादायक : लाॅडाऊन शिथील होताच सुरू झाल्या आहेत या भयानक घटना
 

ते म्हणाले, “लहान मुलांना काय झाले तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाकडून झालेली ही चूक समोर आणणे हा पक्षाचा किंवा राजकारणाचा कोणताही हेतू नाही. मुळात लॅब होत नाही, त्यामुळे या घटना गंभीरपणे पुढे येत आहेत. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांच्या मनातही भीती आहे. त्यांचेही स्वॅब घेतले जात नाहीत. आरोग्य विभागाचा हा बेजबाबदारपणा आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला तर प्रशासन जबाबदार राहील. जिल्ह्यात जो प्रकार घडला आहे. त्या प्रकारात कुणीही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे. जिल्ह्यात मुंबई किंवा इतर भागातून येणार्‍या लोकांचे टेंपरेचर घेतले जात नाही. ही सुद्धा गंभीर बाब आहे. याबाबत पावसाळी अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे.”

हे पण वाचा - बापाच्या त्या चुकीमुळे सोन्यासारखी दोन लेकरे झाली पोरकी.. 

ते पुढे म्हणाले, “जिल्ह्यात क्वारंटाईन कक्षामध्ये असलेली मंडळी फुगडी घालतात हा गंभीर प्रकार आहे. अशा ह्या प्रकारामुळे अनेकजण बाधित होऊ शकतात. या प्रकारामुळे आणि जे काय घडत आहे त्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही.”

loading image
go to top