esakal | मग काय सगळीकडे अंधारच अंधार: नितेश राणेंची आदित्य ठाकरे यांच्यावर कडक शब्दात टिका
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane tweet criticized by aditya thakare

...आणि पेंग्विन गँगची पार्टी सुरू

मग काय सगळीकडे अंधारच अंधार: नितेश राणेंची आदित्य ठाकरे यांच्यावर कडक शब्दात टिका

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी: भरमसाठ वीज बिलांवर आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रहार केला आहे. महाविकास आघाडीने नाईट लाईफ जास्तच मनावर घेतलय आणि वीजबिल इतकी दिली की कोणच भरणार नाही, मग काय सगळीकडे अंधारच अंधार आणि पेंग्विन गँगची पार्टी सुरू, अशा आशयाचे  ट्वीट आहे.


सिंधुदुर्गासह सर्वत्र वीजबिलांचे वितरण झाले आहे. ही बिले भरमसाठ असल्याचा आरोप होत आहे. यालाच अनुषंगुन आमदार राणे यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लक्ष केले आहे. यात अप्रत्यक्षरित्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही पुन्हा टिका केली आहे. ठाकरे यांनी मुंबईतील नाईट लाईफचे समर्थन करणारी भूमिका याआधी मांडली होती. याच अनुषंगाने ट्वीटची सुरूवात आहे.

यात म्हटले आहे की, ‘महाविकास आघाडी सरकारने नाईट लाईफ जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते. विजबिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार आणि मग पेग्विन गँगची पार्टी सुरु.’

संपादन- अर्चना बनगे

loading image
go to top