राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही : नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ७० पैकी ५७ ५७ ग्रामपंचायती जिंकत भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी जिंकलेले उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा करताना सोशल माध्यमांवर आपले फोटो शेअर केले आहेत. यावर राणेंना धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही, ना पुढे येणार अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने भरगोस यश मिळवून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवडे, चिंदर, चुनवरे, दांडेली, कोलगाव सेनेकडून हिसकावून घेतल्या आहेत. सिंधुदुर्गातील आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहता येथील जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या बिलांचे समर्थन जिल्ह्यातील जनता करत आहे हेही दाखवून दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर आता पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँक यात देखील सत्ता देखील आमचीच असणार आहेत आणि विरोधक हद्दपार होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास नितेश राणें यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालादरम्यान दिला आहे. 

हेही वाचा - Gram Panchayat Results : सावर्डेत पुन्हा एकदा आमदार निकम यांची सत्ता

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitesh rane win 90 percent seat in grampanyat election in sindhudurg