..या अटीमुळे रत्नागिरी आगारातून एकही बस सुटली नाही.... 

सकाऴ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

.22 प्रवासी उपलब्ध झाल्यानंतरच बस सोडण्यात येणार अशी अट असल्याचा बोर्ड एसटीने लावला आहे.

रत्नागिरी : तब्बल 2 महिन्यांनी एसटीची मर्यादित वाहतूक आज सुरू झाली खार; पण रत्नागिरी आगारातून 1 ही बस सुटलीच नाही. 22 प्रवाशांचा कोटा पूर्ण न झाल्याने एकही बस सुटलेली नाही.

लॉकडाऊन नियमांमध्ये २२ मे पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल जारी केले . यात जिल्हांतर्गत बससेवा तसेच रिक्षा यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत जिल्हयात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी बस सेवा सुरु करात येईल असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा- करवीर तालुक्‍यातील 25 गावांची कोरोनाबाबत अशी दक्षता -

मात्र आज रत्नागिरी आगारातून एकही बस धावली नाही. रत्नागिरीतुन दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट 22 प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येईल असा बोर्ड रहाटघर बसस्थानक येथे लावण्यात आला होता. या निर्णयाचा फटका रत्नागिरी आगारातून एकही बस सुटू शकली नाही. 22 प्रवाशांना कोटा पूर्ण न झाल्याने या आगारातून एकही बस सुटली नाही.22 प्रवासी उपलब्ध झाल्यानंतरच बस सोडण्यात येणार अशी अट असल्याचा बोर्ड एसटीने लावला आहे. तेवढे प्रवासी उपलब्ध न झाल्याने गाडी सुटली नाही.                     
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No bus running from Ratnagiri division