

Absence of October heat brings cool breeze and scenic beauty in Pali
Sakal
पाली : जिल्ह्यात पहाटे सर्वत्र धुक्याची दुलई पसरत आहे. धुक्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मात्र अल्हाददायक वातावरणाचा पर्यटक व प्रवाशी मनसोक्त आनंद लुटत आहेत. दुपारी सुद्धा वातावरणात गारवा जाणवत आहे. याशिवाय डोंगरावर विशेषतः पांढऱ्या शुभ्र व करड्या रंगांचे ढग दाटून येत आहेत. जणूकाही येथे स्वर्गच असल्याचा भास होतो. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखीच बहारदार होतो. त्यामुळे येथून प्रवासी व पर्यटक सुद्धा ढग, हिरवाई, व धुक्याचा आनंद घेत आहेत. ट्रॅकिंग व पर्यटनासाठी हे वातावरण उत्तम आहे. त्यामुळे बरेचसे ट्रेकर व पर्यटक किल्ले, डोंगर, समुद्रकिनारा आदी ठिकाणी भटकंती करत आहेत. आणि या अद्भुत निसर्गाची मज्जा लुटतात.