सिंधुदुर्गात कोविड 19 रुग्णांसाठीची उपलब्ध बेडची संख्या; जाणून घ्या

number of beds available for Covid 19 patients in Sindhudurg health marathi news
number of beds available for Covid 19 patients in Sindhudurg health marathi news
Updated on

ओरोस : सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात सध्या १४६ रुग्ण सक्रीय आहेत. आतापर्यंत ७० हजार ६४८ कोरोना टेस्ट झाल्या आहेत. रिकव्हरी रेट ९४.७७ टक्के आहे. मृत्यु दर २.७ टक्के आहे. टेस्ट मधील बाधित येणाऱ्या रुग्णाची संख्या १०.३० टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी असणाऱ्या स्थितीत सिंधूदुर्ग राज्यात दूसरा आहे. आतापर्यंत २२ हजार २३३ लोकांनी कोरोना लस घेतली आहे. जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली व शिरोडा उपजिल्हा रुग्णालय तसेच आठही ग्रामीण रुग्णालये तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसिकरण सुरु करण्यात आले आहे.

सक्रीय १४६ रुग्णापैकी ७० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. परिणामी किरकोळ रुग्ण जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचार घेत आहेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णावर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे सध्या  जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी खाटा कमी पडत नाहीत.सध्या . २२५ बेड येथे कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयातच कोरोना रुग्णावर उपचार केला जात आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com