पोटच्या मुलीशी अश्‍लील वर्तन; बापाला ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

कणकवली - पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या एका नराधम बापाला कणकवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मानवतेला काळिमा फासणारा हा घृणास्पद प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास तालुक्‍यातील एका गावात घडला आहे.

कणकवली - पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या एका नराधम बापाला कणकवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मानवतेला काळिमा फासणारा हा घृणास्पद प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास तालुक्‍यातील एका गावात घडला आहे.

या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या नराधमास आज (ता. १३) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी त्या संशयित नराधम बापावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्‍सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याबाबत त्या पीडित बालिकेने येथील पोलिसात दिलेल्या जबाबावरून फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

तालुक्‍यातील एका गावात मोलमजुरी करणारा सुमारे ४५ वयोगटातील तो नराधम आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. आपली पत्नी आणि दोन मुलींसह तो राहत आहे. गेल्या काही वर्षात तो त्या मुलींशी घाणेरडे चाळे करत असे. परंतु मुलीच्या आईला ते लक्षात आले नाही. मंगळवारी दुपारच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत तो घरी आला. त्याने आपल्या दोन्ही मुलींना जवळ घेतले. साधारण १५ वर्षे मुलीच्यासोबत त्याने अश्‍लील वर्तन सुरू केले. तिने हा प्रकार आईच्या कानावर घातला. यातून त्यांच्या घरात वाद झाला. मात्र नराधम बापाला अद्दल घडविली पाहिजे म्हणून आईने मुलींसह पोलिस स्टेशन गाठले. येथील पोलिस अधिकाऱ्यांना घटनेची वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर विनयभंग आणि पोक्‍सो अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयित नराधम बापाला अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जयश्री पाटील करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Obscene behavior with own girl father arrested