कोकणात यंदाचा बालदिन सुनासुनाच

प्रमोद हर्डीकर
Saturday, 14 November 2020

शाळांना सुट्टी असल्याने लहानग्यांचे कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत.

साडवली (रत्नागिरी) : चाचा नेहरुंचा जन्मदिवस १४ नोव्हेंबरला देशभरात बालदिन म्हणुन साजरा होतो. मात्र यंदा कोरोनामुळे तो दीन झाल्याचे पहायला मिळाले. शाळांना सुट्टी असल्याने लहानग्यांचे कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत. कुठे फुगे फुटले नाहीत, ना खाऊचे वाटप झाले. 

बालदिनाला देवरुख शहरात विविध उपक्रम राबवले जात होते. स्नेहपरिवार बालदिनाला विविध कार्यशाळा घेत होता. यंदा मात्र असा कोणताच कार्यक्रम झाला नाही. बालचमुंनाही तो साजरा करता आला नाही. बालदिनाचे औचित्य साधुन पतंग महोत्सव, बालमहोत्सवाचे नियोजन असायचे. अभिनय कार्यशाळा होत होत्या. यंदा कोरोनाने गेले आठ महिने वास्तव्य केल्याने ना शाळा भरल्या, ना मुलांसाठी कोणते उपक्रम झाले. तरीही ऑनलाईनमुळे अभ्यास, विविध स्पर्धा यातुन मुलांना थोडे समाधान मिळाले. पण ऑनलाईन हे तसे कृत्रिम वातावरण ठरले. 

हेही वाचा - चक्क बॅंकेचीच केली फसवणूक ; १४ लाखाचे नकली दागिने ठेवले गहाण -

वास्तवात खेळीमेळीच्या वातावरणात बालदिनी आनंदात बागडणारी मुले यंदा तोंडाला मास्क लावुन फिरताना दिसली. कोरोनामुळे सगळेच व्यवहार बारगळले. त्यात बालदिन ही दीन झाला. बालदिनी जादुचे प्रयोग सादर व्हायचे, बालनाट्ये बंद असल्याने तोही आनंद यावर्षी मुलांना घेता आला नाही. मात्र यंदाची दिवाळी बालदिनीच आल्याने मुलांनी दिपोत्सवाचा आनंद लुटला. 

नवे कपडे, दिवाळीचा फराळ खात, फटाके वाजवुन व किल्ले तयार करुन मुलांनी आनंद मिळवला. पर्यावरणासाठी मुलांनी प्रदुषण होणारे फटाके वाजवले नाहीत हे विशेष ठरले. यामुळे दिवाळीत बालदिन झाकोळला असला तरी दिपोत्सवाने या मुलांच्या जीवनात प्रकाशवाटा निर्माण झाल्या असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.

हेही वाचा - ऋषीकेशच्या जीवनाची आता सुरुवात झाली होती म्हणत वडीलांच्या भावनांचा फुटला बांध -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on the occasion 14 november children's day not celebrated in sadavali ratnagiri due to corona and closed schools