कोकणात आजी आजोबा करत आहेत शेतीत विविध प्रयोग ; आरारोटच्या लागवडीच्या खासियत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

दरवर्षी शेतीसह आरारोट, हळद, काळी मिरी आणि गांडूळ खताच्या विक्रीतून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.

रत्नागिरी : भातशेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय निर्माण व्हावा, ही संकल्पना वापरून तालुक्‍यातील घारपुरेवाडी-कोतवडे येथील वृद्ध शितप दाम्पत्याने भातशेतीबरोबरच औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. दरवर्षी शेतीसह आरारोट, हळद, काळी मिरी आणि गांडूळ खताच्या विक्रीतून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.

हेही वाचा - शेतीला कुंपण घालायच आहे ? हा आहे घरगुती उपाय...

मुबलक जागा आणि शेतीची आवड यामुळे या वयातही दोघे शेतीत विविध प्रयोग करत आहेत. गेली तीन -चार वर्षे आयुर्वेदिक आरारोट (सत्त्व), हळद, कोकम, जायफळ, दालचिनी, काळी मिरीचे उत्पादन घेत आहेत. गांडूळ खताचीही निर्मिती केली आहे. दाम्पत्याला शेतीची चांगली माहिती आहे. शेतीतून वेगळेपण साधण्यासाठी शितप दाम्पत्याने शेतीला पूरक असा व्यवसाय निर्माण केला. त्यासाठी त्यांनी कोकम, काळीमिरी, दालचिनी, जायफळ बागेत लावून उत्पादन घेत आहेत. गेली तीन वर्षे मनीषा यांनी आरारोटची शेती करून त्यापासून तयार होणारे सत्त्व तयार करून विक्री करत आहेत. हजार रुपये किलोने याची विक्री होत असते. त्या म्हणाल्या, आरारोट हे एक औषधी वनस्पती-रोप आहे. त्याच्या मुळापासून सत्त्व निघते. औषध म्हणूनही त्याचा उपयोग होतो. 

हेही वाचा - अखेर जाल्यात माेसोली घावली चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी...

गांडूळ खताला मागणी

शेतीसाठी पूरक व्यवसायासाठी दोन बेडमध्ये गांडूळ खताची निर्मिती केली. गांडूळखताचा वापर शेतात, हापूस कलमांना, झाडांना तसेच मिरची, काजूच्या झाडांना चांगला उपयोग होतो, असे मनीषा शितप सांगतात.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old husband wife farming various project ararot is the crop of medicines in ratnagiri