esakal | शेतीला कुंपण घालायच आहे ? हा आहे घरगुती उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

for protection of farm and crop easily use saree for protected farming in konkan

शेतातील हिरवे पीक वन्यप्राण्यांच्या नजरेला पडू नये, यासाठी शेतकरी हे प्रयत्न करत आहेत.

शेतीला कुंपण घालायच आहे ? हा आहे घरगुती उपाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : शेतातील पिके पोसवू लागली असून, मंडणगड तालुक्‍यात वन्यजीवांच्या उपद्रवाची प्रमुख समस्या शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. रानडुकरे, केलटी, वानरे, पक्षी, जंगली श्‍वापदांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. लोळण घेऊन रोप ओरबाडून खात असल्याने खाण्यापेक्षा अधिक नुकसानच ही श्‍वापदे करत आहेत. यापासून बचाव व्हावा, यासाठी शेतांचे बांध रंगबिरंगी साड्यांनी सजविल्याचे चित्र दिसू लागले आहे. घरातील जुन्या साड्या वापरून साड्यांची शेतीला तटबंदी केली आहे.

हेही वाचा - अखेर जाल्यात माेसोली घावली चिंगळं मिळाल्याने मच्छीमार समाधानी...

निसर्गाच्या हिरव्या रंगात हे रंगबिरंगी कुंपण लक्षवेधी ठरत आहे.
शेतातील हिरवे पीक वन्यप्राण्यांच्या नजरेला पडू नये, यासाठी शेतकरी हे प्रयत्न करत आहेत. शेती वाचविण्यासाठी वेगवेगळी धडपड शेतकरी करताना दिसत आहेत. तालुक्‍यात सध्या भात, नाचणी पालेभाज्यांचे उत्पादन सुरू आहे. वांगी, लाल माठ, भेंडी, पावटा, पालक, मुळा, पडवळ, हिरवी मिरची, केळी, कलिंगड यांचे उत्पादन घेण्याचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला आहे.

वन्यजीवांपासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी गोठे, बंदरवाडी, बोरखत, नायणे, वडवली, कोन्हवली, देव्हारे, कुडुक बुद्रुक, आंबवली, उमरोली, पाचरल, पाले, तुळशी, अडखळ व खलाटी भागांत जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. या भागातील शेतकऱ्यांनी जुन्या साड्यांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. तसेच बुजगावणी उभी करून रंगीत कपड्यांचा वापर करून शेतात माणसांचा वावर असल्याचे चित्र उभे केले आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी पडद्याची तटबंदी उभी केली आहे.

हेही वाचा -  नागदेवतेचा तीन दिवस बाप्पासोबत मुक्काम, कुटुंबाची पाचावर धारण...

वानरे सहज भेदतात

रंगबिरंगी साड्यांचे कुंपण पाहून जंगली श्‍वापदे आपला मार्ग बदलतात; मात्र वानरांवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. साडी कुंपणामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. तरीही, वानरे या तटबंदीला सहज भेदतात.

संपादन - स्नेहल कदम

loading image
go to top