esakal | ओंकार पोचरी गावात करतोय ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याचे स्वप्न पूर्ण...
sakal

बोलून बातमी शोधा

omkar dhamane trying successfully Self reliant India mission at pachori village in ratnagiri

उच्चशिक्षित युवक विद्यार्थ्यांना शिकवतोय आत्मनिर्भरता

ओंकार धामणे ; पोचरी गावात नियम पाळून उपक्रम

ओंकार पोचरी गावात करतोय ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याचे स्वप्न पूर्ण...

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : कोरोना व लॉकडाउनमुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष अजून सुरू झाले नाही. मात्र ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. पण गावांमध्ये ऑनलाइनची सुविधा नाही. मग अभ्यास व्हायचा कसा? याकरिता पोचरी-धामणेवाडी (ता. संगमेश्‍वर) येथे ओंकार धामणे या उच्चशिक्षित युवकाने पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरवात केली. कोरोनाविषयक सर्व नियम पाळून विद्यार्थी दररोज गणित, इंग्रजी आणि आत्मनिर्भरता आणि करिअरचे धडे शिकू लागले आहेत.


कोरोनावर मात करताना पंतप्रधानांनी जाहीर केलेला ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ओंकारने योगदान देण्यास सुरवात केली आहे. मे मध्ये गावी आलेला ओंकार 28 दिवस क्वारंटाईन होता. शाळा बंद असल्याने मुलांना शिकवण्यासाठी वर्ग सुरू करण्याची कल्पना त्याने वाडीत सांगितली. त्याची ही धडपड पाहून वाडीतील सभागृह व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. सुरवातीला पालक मुलांना बाहेर पाठवत नव्हते. परंतु सर्व नियमांचे पालन करून खबरदारी घेतली जाणार असल्याचे समजावून सांगितल्यानंतर हळुहळू मुलांची संख्या 10 वरून 45 वर गेली. जागेचा तुटवडा निर्माण झाला. तेव्हा ओंकारने घरामध्ये जागा उपलब्ध करून दिली. 

हेही वाचा- कोकणवासीयांचा सवाल : श्रमिक रेल्वे सेवा सुरू केल्याचे श्रेय घेणारे पुढारी गेले तरी कुठे...? -


ओंकार पूर्व प्राथमिकच्या वर्गात मराठी, गणित, इंग्रजी, प्राथमिकला गणित, इंग्रजी, बुद्धीमत्ता, माध्यमिक वर्गातील मुलांना गणित आणि करीअर मार्गदर्शन करतो. कोणतीही अपेक्षा न बाळगता सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंतचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले आहे. कामानिमित्त बाहेरगावी असणार्‍या लक्ष्मण धामणे आणि विनायक धामणे यांचेही मोलाचे योगदान लाभत आहे.

हेही वाचा- सावंतवाडीत कशाची भीती? प्रशासनही झालेय सतर्क..वाचा सविस्तर -

ओंकारला करायची आहे पीएचडी..

ओंकारचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच पोचरी गावातच झाले. नंतर त्याने गोगटे-जोगळेकर कॉलेजमधून बीएस्सी व मुंबई विद्यापीठातून एमएस्सी (भौतिकशास्त्र) पूर्ण केले. सेट, नेट, गेट यासारख्या परीक्षा उत्तीर्ण झाला लवकरच पीएचडी करायचे स्वप्न आहे. ओंकारने वर्षभर मुंबईच्या शासकीय विज्ञान संस्था येथे पदव्युत्तर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

loading image