दोन हजाराची लाच घेतांना कोतवाल जाळ्यात

सुनील पाटकर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

जगदिश लक्ष्मण साळवी असे या कोतवालाचे नाव असून, तलाठ्याच्या नावाचा वापर करुन त्यांने या लाचेची मागणी केली होती. या बाबत तक्रार दाखल केलेल्या इसमाला आपल्या वडिलोपार्जित मिळकतीच्या सात बारावर वारस नोंद करून घ्यायची होती. परंतु किंजळोली बुद्रूक येथील तलाठी सजात काम करणा-या जगदिश साळवी यांने ही नोंद करुन घेण्यासाठी तलाठ्याला दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. यानंतर या विभागाचे उपअधिक्षक विवेक जोशी यांनी महाड तहसील कार्यालयाबाहेर सापळा रचून लाचेची रक्कम स्विकारताना साळवीला रंगेहाथ जाळ्यात पकडला. महाड तालुक्यात यापूर्वी तीन मंडल अधिकारी व एक तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडूनही महसूल विभागातील लाच प्रकरणे थांबतांना दिसत नाहीत.

Web Title: one arrested for taking bribe