शेतकऱ्यांनो वर्षानुवर्षे एकच वाण घेताय ?

one crop cultivated in many time its effects on farming do not support to fertilizer in ratnagiri
one crop cultivated in many time its effects on farming do not support to fertilizer in ratnagiri
Updated on: 

राजापूर : वर्षानुवर्षे एकच वाण घेतल्याने ठराविक किडी रासायनिक उपायांना प्रतिसाद देईनाशा झाल्या आहेत. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने संशोधित आणि विकसित केलेल्या भात बियाण्यांचा उपयोग करावा, असा सल्ला प्रा. महाले आणि डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला. 

लष्करी अळींच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लांजा येथील कृषी विज्ञान केंद्र आणि राजापूर कृषी विभागाने शेताच्या बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. लष्करी अळींचा भाताच्या उत्पादनावर थेट परिणाम झाला नसला तरी, भविष्यात तशी आपद्‌ग्रस्त स्थिती उद्‌भवल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. महेश महाले आणि डॉ. संदीप पाटील यांनी शेतकऱ्यांना बियाणे पेरणीपूर्व दक्षता, कीडनियंत्रण या संबंधित मार्गदर्शन करताना कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बियाण्यांचा उपयोग करावा, असे आवाहन केले. 

तालुक्‍यातील खाडीपट्ट्याच्या भातपिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. भातावर विविधांगी किटकांसह किडींचा होणारा प्रादुर्भाव आणि त्यावर नियंत्रण कसे राखावे, उत्पादन वाढीसाठी काय केले पाहिजे, कोणते वाण वापरावे, आदींच्या अनुषंगाने लांजा येथील कृषी विज्ञान केंद्रातील अभ्यासकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या शिष्टमंडळामध्ये पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत एकल, तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुहास पंडित, मंडल कृषी अधिकारी संतोष मदने आदींचा समावेश होता. या वेळी तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी पीक फेरपालट, रोग व कीड नियंत्रण आदींच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शिष्टमंडळाने राजापूर, पाचल परिसरासह जुवाठी, कोंड्येतर्फे सौंदळ आदी भागात संवाद साधला. 

दृष्टिक्षेपात

- कृषी विज्ञानच्या अभ्यासकांचा शेतकऱ्यांशी संवाद 
- खाडीपट्ट्याच्या पिकावर लष्करी अळींचा प्रादूर्भाव 
- नियंत्रण कसे राखण्याबाबत केले मार्गदर्शन 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com