ट्रक - जीप अपघातात देवगडचा एक ठार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 May 2019

एक नजर

  • आवाशी येथे जीप व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक
  • अपघातात देवगड - पोंभुर्ले येथील एकजण जागीच ठार, तर तिघेजण गंभीर जखमी
  • जखमीमध्ये एका लहान मुलाचा समावेश
  • आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अपघात. 
  • संजय रघुनाथ कांबळे (वय ५८, मुळ रा. देवगड-पोंभुर्ले, सध्या रा. कामोठे-नवी मुंबई) असे मृताचे नाव. 

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील आवाशी येथे जीप व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात देवगड - पोंभुर्ले येथील एकजण जागीच ठार झाला, तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास झाला. संजय रघुनाथ कांबळे (वय ५८, मुळ रा. देवगड-पोंभुर्ले, सध्या रा. कामोठे-नवी मुंबई) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की ट्रकचालक बळदेवसिंग संतोषसिंग (रा. राजकोट) हा (जी. जे. 03 ए. एक्स 5592)  गोव्याहून राजकोटच्या दिशेने जात होता तर जीप चालक महंमद शहजाद इस्लाम नदाफ (वय २७, रा. मदनपुरा-भायखळा) (एम. एच. 09 सीयू 5420) नवी मुंबईहून देवगडच्या दिशेने येत होता. याच दरम्यान रत्नागिरी येथील आवशी दवाखाना या ठिकाणी या दोन वाहनात समोरासमोर धडक झाली.

या अपघातात संजय कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नील (वय 30), दीपक (वय 40) व त्यांच्यासोबत असलेला लहान मुलगा असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. द

रम्यान स्मिता संजय कांबळे (वय ५०), सुचिता संजय कांबळे (वय २८), आर्यन संदेश कांबळे (वय ६) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना १०८ रुग्णवाहिकेने चिपळूण येथील एस. एम. एस. रुग्णालयात हलविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dead from devgad in Truck and Jeep accident