आदेश डावलून विकले कांदे, पोचले पोलिस ठाण्यात

onion sale Police action sateli bhedshi konkan sindhudurg
onion sale Police action sateli bhedshi konkan sindhudurg

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - घाटमाथ्यावरचा भाजीपाला दोडामार्ग तालुक्‍यात आणण्यास बंदी असताना कोल्हापूर येथून कांदे घेऊन आलेल्या दोघांना साटेली भेडशी सरपंच लखू खरवत यांनी रोखले आणि मिनी टेंपोसह त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ते गेले काही दिवस परिसरातील गावात जाऊन कांदे विकत होते. त्याला श्री. खरवत यांनी आक्षेप घेऊन पुन्हा न येण्याबाबत बजावले होते. तरीही ते पुन्हा आल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

संबंधित दोघेजण मिनी टेंपोतून वाशीनाका, कोल्हापूर येथून दोन टन कांदे घेऊन आले. ते आजरा, आंबोली मार्गे साटेली भेडशीत आले. त्यांनी घरोघरी जात कांद्याची पोती विकली. एकट्यानेच वीस रुपये किलो दराने पन्नास किलोची तीस पोती विकत घेतल्याची माहिती ग्रामपंचायतीत दिली. यावेळी सरपंच खरवत, उपसरपंच सूर्यकांत धर्णे, सदस्य गणपत डांगी व श्री. भिसे, तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश धर्णे, ग्रामसेवक एस. बी. गावडे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, कोरोना कृती समिती अध्यक्ष तथा सरपंच लखू खरवत यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक सुनील बागल यांनी त्या दोघांना टेंपोसह सोडून दिले. राज्यातील कुणीही कुठेही कांदे, बटाटे, भाजीपाला विकू शकतो, त्याला तुम्ही अडवू शकत नाही, असे सांगितले. प्रत्यक्षात त्यांच्या परवाना अर्जाच्या पोचपावतीवर कोल्हापूर जिल्ह्यात परतल्यावर किमान चौदा दिवस क्वारंटाईन राहणे आवश्‍यक असल्याची स्पष्ट टीप आहे. असे असताना ते कोल्हापूर-सिंधुदुर्ग असा सतत प्रवास कसा करतात? असा प्रश्‍नही खरवत यांनी विचारला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com