नोकरी हवीय ? वेबसाइटवर करा आधारकार्ड लिंक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

मेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नाव नोंदणीमध्ये आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने लिंक करणे आवश्‍यक आहे.

रत्नागिरी : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नाव नोंदणीमध्ये आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने लिंक करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा - कोकणाच्या विकासासाठी फिश लॅडींग सेंटर्स गरजेचे : खा. सुनील तटकरे यांची अधिवेशनात मागणी 

नोंदणीतील माहिती ३० सप्टेंबरपर्यत अद्ययावत करणे आवश्‍यक आहे. या करिता सेवायोजन कार्यालयातील नाव नोंदणीमध्ये आपल्या आधारकार्ड नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी आपला युजर आयडी व पासवर्ड वापरून आपल्या आधार कार्ड क्रमांकासह आवश्‍यक असलेली आपली सर्व माहिती भरावी.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http:// rojgar.mahaswayam.gov.in . या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबरपर्यत अद्ययावत करावी. ही माहिती वेबपोर्टलवर अद्ययावत न केल्यास वेबपोर्टलवरील आपली नोंदणी रद्द होईल. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त तांबे यांनी दिली.

हेही वाचा - मालवण स्मशानात अंत्यविधीस विरोध, अखेर पालिकेची मध्यस्थी

 

संपादन - स्नेहलत कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online aadhar card link to website in ratnagiri invocation to candidate