रत्नागिरीत 8 तासात ऑनलाइन दारू विक्रीचा बदलला निर्णय ; असा आहे नविन निर्णय

online alcohol delivery design in government
online alcohol delivery design in government

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने दारू विक्री संदर्भात 8 तासात ऑनलाइन दारू विक्रीचा निर्णय बदलला आहे. त्याऐवजी आता जिल्ह्यातील सर्व दुकानांवर योग्य ते नियम आणि निकष पाळून सीलबंद दारूची विक्री करण्याचे नवीन आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण नारायण मिश्रा यांनी काढले आहे. यामुळे तळीरामांना 40 ते 42 दिवसानंतर  मोठा दिलासा देणारा हा निर्णय ठरणार आहे.


कोरोना व्हायरसाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाउन सुरू आहे. 17 मे या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन राहणार आहे. परंतु, या टप्प्यात दारू विक्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे. परंतु, तळीरामांची झुंबड उडाल्यामुळे रत्नागिरीसह काही जिल्ह्यात पुन्हा एकदा दारू बंदी करण्यात आली. मात्र यात शासनाचा महसूल बुडत असल्याने रत्नागिरीत घरपोच ऑनलाईन दारू विक्रीची शक्कल लढवली गेली. गेल्या 42 दिवसांपासून बंद असलेल्या दारुची दुकानं खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर तळीरामांना रान  मोकळे झाले.

राज्यात ठिकठिकाणी वाईन्स शॉप बाहेर तळीरामांनी लांबच्या लांब रांगा लावल्यात. पण, कोरोनाच्या परिस्थितीत ही बाब गंभीर असल्यामुळे काही जिल्ह्यात दारू बंदी करण्यात आली. पण, यावर तोडगा म्हणून दारुची होम डिलिव्हरी (Home Delivery) सुरू करण्याचा विचार पुढे आला. काही राज्यांनी याची सुरुवात देखिल केली आहे.राज्यात रत्नागिरी जिल्हात घरपोच दारू देणारा जिल्हा म्हणून चर्चेत आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी तशी घोषणा केली.  

नियमावलीही तयार करून मद्यपींना आधी ऑनलाइन फॉर्म भरावा लागले. त्यानंतरच त्यांना घरपोच दारूची सेवा देण्याचे निश्चित झाले. काही कारणास्तव प्रशासनाची ही योजनाही बारगळली .अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आठ तासांमध्ये नवा आदेश जारी केला. त्यानुसार कोरोनाच्या संसर्ग बाबतचे सर्व नियम पाळून दारू दुकानांना सीलबंद दारू विकण्याची परवानगी दिल्याचे नव्याने आदेश काढले. त्यामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com