ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक ठरतीये डोकेदुखी

online buying and transaction fraud cases increased in chiplun ratnagiri
online buying and transaction fraud cases increased in chiplun ratnagiri
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत. २०२० या वर्षात १२ गुन्हे दाखल झाले आहेत. सरासरी महिन्याला एकप्रमाणे येथील पोलिस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. 

ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविल्यानंतर वेगळीच डीश मिळणे, मोबाईलऐवजी लाकडी बॉक्‍स येणे, बॅंकेतून परस्पर पैसे ट्रान्स्फर होणे, ऑनलाइन तिकीट काढल्यानंतर नियोजित आसनावर वेगळ्याच व्यक्तीचे बुकिंग अशा प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी येथील पोलिस ठाण्यात दाखल होत आहेत. बॅंकेतून ऑनलाइन पैसे काढून घेण्याचे सर्वाधिक सात गुन्हे आहेत. यात गुन्हेगारांना पकडण्याचे प्रमाण नगण्य आहे. एकदा फसवणूक झाल्यानंतर झालेले नुकसान पुन्हा भरून येईलच, याची शाश्‍वती ग्राहकांना नाही.

कॉलेज तरुण, गृहिणींपासून वयोवृद्ध लोक ऑनलाइन फसवणुकीची शिकार ठरत आहेत. ग्राहकांच्या ऑनलाइन खरेदीच्या बदलत्या मानसिकतेबरोबर ग्राहकांच्या अशा फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. ग्राहकांच्या तक्रारींचे कायद्यात नऊ विभागांत विभाजन केले आहे. त्यात ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

ऑनलाइन फसवणुकीत व्यक्तीकडून पैसे वसूल करण्यासाठी त्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसासमोर असते. चिपळूण पोलिस ठाण्यात दाखलपैकी एकाही गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. गुन्हेगाराला शोधून त्याच्याकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया क्‍लिष्ट आहेत. टूर्स व विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, शैक्षणिक संस्था यांच्याबाबत असलेल्या तक्रारींचे प्रकारदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. टूर आयोजित करून आमिषे दाखवायची व ती पूर्ण करायची नाहीत, असे प्रकार येथे घडत आहेत.  

... तरी पैसे मिळण्यात अडचण

एखाद्याची फसवणूक झाली तर ग्राहक दाद मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे जातात. तेव्हा संशयिताला शोधून आणून त्याला न्यायालयात हजर करण्याची यंत्रणा ग्राहक मंचाकडे नाही. त्यामुळे ग्राहकांच्या बाजूने निकाल लागला तरी त्याला प्रत्यक्ष पैसे मिळण्यात अडचणी येतात.

"कायद्याची ओळख नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते. विक्रेत्याला एखादी वस्तू विकण्याचा अधिकार आहे का? तो अधिकृत विक्रेता आहे का? या सर्व बाबींची चौकशी केल्यास त्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण कमी होईल."

- संदीप नाईक, पोलिस कर्मचारी, चिपळूण पोलिस ठाणे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com