esakal | मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

 Online meeting of Malvan Municipality

आगामी गणेशोत्सव नियोजनाबाबत ही बैठक झाली. यावेळी उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या.

मालवण पालिकेच्या इतिहासात प्रथमच उपक्रम, काय आहे तो? वाचा...

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) -  शासनाच्या निर्देशाप्रमाणे येथील पालिकेची विशेष सभा काल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. शतकामहोत्सवी मालवण पालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच ऑनलाईन सभा ठरली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत 19 नगरसेवक सहभागी झाले. नगराध्यक्ष दालनात स्क्रीन प्रोजेक्‍टरद्वारे सर्व नगरसेवकांशी जोडले गेले.

यात प्रामुख्याने गणेशोत्सवाचे नियोजन झाले. यात उपनगराध्य राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, नितीन वाळके, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शीला गिरकर, सेजल परब आदी सहभागी झाले. 

वाचा - मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली चा फ्लाओर ब्रिज कोसळला; उडाली दाणादाण 

आगामी गणेशोत्सव नियोजनाबाबत ही बैठक झाली. यावेळी उपस्थित सदस्यांनी सूचना मांडल्या. दरम्यान, लवकरच मालवण पालिका सेवाभावी संस्था, व्यापारी, नागरिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. 

विविध विषयांवर चर्चा 
शहरात कचरा उठाव, झाडे छाटणे, डास फवारणी याबाबत जादा कर्मचारी नेमून नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. स्ट्रीट लाईट दुरुस्ती, बंद हायमस्ट दुरुस्ती करणे, गणेश विसर्जन ठिकाणी व्यवस्था करणे याबाबतही चर्चा झाली. तर शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी घरोघर जाऊन केली जावी. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कॉरंटाईन कालावधी असावा. शहरातील प्रमुख मार्गावर कर्मचारी नेमून बाहेरून आलेल्या व्यक्तींची तपासणी व्हावी. याबाबतही चर्चा झाली, असे नगराध्यक्षांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील

loading image