Maratha Reservation OBC
Maratha Reservation OBCesakal

Maratha Reservation : 'मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला अन् 52 टक्केत आरक्षण देण्यास ओबीसींचा तीव्र विरोध'

कुणबी आणि मराठा या जाती वेगवेगळ्या आहेत, हे मराठा नेत्यांनीच सिद्ध केले आहे.
Summary

काही उच्चवर्णीय मराठे सरसकट कुणबी दाखले घेण्यास तयार नाहीत. कोकणात तर नारायण राणे, रामदास कदम यांनी तशी वक्तव्ये केलेली आहेत.

रत्नागिरी : एकीकडे सरसकट कुणबी-मराठा आरक्षणाची (Kunbi-Maratha Reservation) जरांगे पाटील यांच्याकडून होणारी मागणी तर दुसऱ्या बाजूला मराठा गटाकडून मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीला तीव्र विरोध दर्शवला जात आहे.

Maratha Reservation OBC
Loksabha Election : ठरलं! सदाभाऊ आता थेट जुन्या भिडूलाच भिडणार; लोकसभेसाठी 'या' मतदारसंघातून आजमावणार ताकद

याचा अर्थ कुणबी आणि मराठा या जाती वेगवेगळ्या आहेत, हे मराठा नेत्यांनीच सिद्ध केले आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना निवडणुकीत पाडण्याची भाषा केली जात असेल तर ५२ टक्के ओबीसींना मराठा आमदारांना पाडा आणि ओबीसींना विधानसभेत धाडा, असे सूत्र अवलंबावे लागेल, अशी प्रतिक्रिया ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर (Chandrakant Bawkar) यांनी व्यक्त केली.

सध्या सुरू असलेल्या आरक्षणावरील परिस्थितीवर बावकर यांनी पत्रकारांपुढे भाष्य केले. ते म्हणाले, कुणबी दाखला घेणे त्यांना कमीपणा वाटत आहे. जरांगे पाटील यांची मागणी असलेल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्यांना विरोध दर्शवला आहे. अशाप्रकारे सरसकट दाखले कुणाला देता येत नाहीत. कुणबी-मराठा, कुणबी-ब्राह्मण, कुणबी-मारवाडी अशा नोंदी निजामकाळातील कागदपत्रामधून सापडत आहेत मग त्यांनाही कुणबी जातीचे दाखले देणार का, असा प्रश्न बावकर यांनी उपस्थित केला.

Maratha Reservation OBC
Supreme Court : सरकारनं दिलेलं आरक्षण 'या' कारणामुळं सर्वोच्च न्यायालयातून रद्द; वक्कलिग, मराठा समाजात तीव्र नाराजी

मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला देण्यास विरोध आहे तसाच त्यांना ५२ टक्केत आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध आहे. या संबंधी ओबीसी जनमोर्चाच्यावतीने ओबीसींमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मेळावे सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जनमोर्चाच्यावतीने मराठवाड्यात मेळावे होत आहेत. २६ नोव्हेंबरला हिंगोली येथे ओबीसी एल्गार महामेळावा होणार आहे. कोकण दौऱ्यात रत्नागिरी, रायगड येथेही या विषयावर ओबीसी जनमोर्चाच्या सभा झाल्या आहेत. डिसेंबरमध्ये नांदेड, लातूर व ठाणे येथेही मोठे मेळावे होणार असल्याचे बावकर यांनी सांगितले.

Maratha Reservation OBC
'राहुल गांधींच्या भूमिकेशी आपण पूर्णपणे सहमत'; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'या' कारणावरून थेट संघर्ष

त्या नेत्यांचा दृष्टिकोन अयोग्य

काही उच्चवर्णीय मराठे सरसकट कुणबी दाखले घेण्यास तयार नाहीत. कोकणात तर नारायण राणे, रामदास कदम यांनी तशी वक्तव्ये केलेली आहेत. यामध्ये त्यांचा अन्य जातींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अयोग्य आहे. याच भावनेतून कुणबी दाखला घेणे मराठा समाजाला कमीपणाचे वाटते, असे बावकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com