Osargaon Toll Plaza : ओसरगाव टोलनाक्यावर व्यावसायिक गाड्यांना 50 टक्के सवलत; पालकमंत्री राणेंकडून टोलमाफीचे संकेत? टोल कंपनीने 'या' अटी केल्या मान्य

Mumbai Goa Highway toll discount for commercial vehicles : ओसरगाव टोलनाका सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गातील वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध होणार असून जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनांना ५० टक्के टोल सवलत मिळणार असल्याची घोषणा पालकमंत्री नीतेश राणे यांनी केली.
Nitesh Rane Announces Relief for Local Vehicle Owners

Nitesh Rane Announces Relief for Local Vehicle Owners

esakal

Updated on

कणकवली : ओसरगाव टोलनाका कार्यान्वित झाल्‍यानंतर तेथे सिंधुदुर्गातील वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. पिवळी नंबर प्लेट असलेल्‍या जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनांसाठी ५० टक्‍के सवलत दिली जाणार आहे. टोल वसुली करणाऱ्या कंपनीने या बाबी मान्य केल्या (Nitesh Rane toll plaza announcement) आहेत. आपल्या वाढदिवसाच्या औचित्‍यावर सिंधुदुर्गवासीयांसाठी ही भेट आहे. या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, खासदार नारायण राणे यांनी सहकार्य केल्‍याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com