
A Kalpavriksha symbolizing abundance, but the owner still faces losses due to poor decisions.
Sakal
नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणात सतत होणारे बदल, अनियमित पाऊस आणि कीड रोगांचा होणारा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे नारळ निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. संधी असूनही या ‘कल्पवृक्षा’ची व्यवसायिक दृष्टीकोनातून लागवड होत नाही. त्यातून, नारळाचे उत्पादन निम्म्यापेक्षा अधिक घटले आहे. जोडीला परराज्यातून होणारा पुरवठाही मोठ्याप्रमाणात घटलेला आहे. दिवसेंदिवस नारळाची मागणी वाढत असतानाच पुरवठ्यात तफावत निर्माण झालेली आहे. त्याचा परिणाम नारळाच्या दरावर झालेला आहे. बाजारातील नारळाच्या दराने गाठलेल्या ‘साठी’ने ‘कभी खुशी, कभी गम’ अशी स्थिती आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर