सिंधुदुर्गात धुंवाधार : पूरस्थिती धोका निर्माण होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

जिल्हात काल पावसाचा मागमूसही नव्हता. मध्यरात्रीनंतर मात्र धुवांधार पाऊस सुरू आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) :संपुर्ण जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे.यामुळे जिल्ह्यात पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पोसण्याच्या स्थीतीत असलेले भात पिकही अनेक ठिकाणी धोक्यात येणार आहे. 

जिल्हात काल पावसाचा मागमूसही नव्हता. मध्यरात्रीनंतर मात्र धुवांधार पाऊस सुरू आहे. वातावरणातही कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरूच असल्याने काही भागात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पावसाचा जास्त फटका भातपिकाला बसण्याची भीती आहे.

हेही वाचा- संकटांची श्रृखंला संपेना, काजू बागायतदार चिंतेत -

सुपारी व इतर पिकेही बुरशीजन्य रोगाच्या चक्रात अडकण्याची भीती आहे. या पावसामुळे पडझडीचे प्रकारही घडले आहेत. सावंतवाडी शहरात  चितारआळी येथे राजू  हळदणकर यांच्या घराच्या शेजारील संरक्षक भिंत मध्यरात्री अतिवृष्टीमुळे कोसळली.

संपादन - अर्चना बनगे

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P Overnight torrential rain in the entire ossibility of risk of recurrence sindhudurg district