esakal | रत्नागिरी तालुक्यातील `या` ठिकाणची बाजारपेठ आठ दिवस लाॅकडाऊन 
sakal

बोलून बातमी शोधा

Pachal Market Shut Down Till 15 August Ratnagiri Marathi News

गेल्या आठवड्यात पाचल येथे पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. काही दिवसांमध्ये त्या कोरोनो पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यूही झाला. त्यानंतर त्या महिलेच्या संपर्कातील पाच जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले.

रत्नागिरी तालुक्यातील `या` ठिकाणची बाजारपेठ आठ दिवस लाॅकडाऊन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील पाचल येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना त्या महिलेच्या संपर्कातील एकाच दिवसामध्ये तब्बल पाचजण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे सावध झालेल्या पाचल ग्रामपंचायतीने गावाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा गाव स्वयंनियोजनातून क्वारंटाईन केले आहे. व्यापारी संघटनेच्या सहकार्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता पाचल बाजारपेठेचे शटर सोमवारपासून (ता. 10) 15 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन केले आहे. 

गेल्या आठवड्यात पाचल येथे पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. काही दिवसांमध्ये त्या कोरोनो पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यूही झाला. त्यानंतर त्या महिलेच्या संपर्कातील पाच जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले.

पाचलमध्ये रुग्ण वाढल्याने ग्रामपंचायतीने ग्रामकृतीदल, विविध सामाजिक संघटना, व्यापारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पुन्हा एकदा पाचल गाव लॉकडाउन केला आहे. आजपासून बाजारपेठ शनिवारपर्यंत बंद राहणार आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता उर्वरित बाजारपेठ बंद राहणार आहे. लोकांना ग्रामकृती दलाच्या माध्यमातून साहित्य, किराणा माल दिला जाणार आहे. 


दृष्टीक्षेपात राजापूर 

  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 85 
  • बरे झालेले रुग्ण- 64 
  • मृत्यू झालेले रुग्ण- 7 
  • सद्यस्थितीत कार्यरत रुग्ण- 14  

 
 

loading image