आंबोली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकांवर (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला संदेश योग्य आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीय सरकारसोबत असले पाहिजेत. परंतु, सरकारने कोणताही निर्णय घेताना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय संरक्षणमंत्री खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.