Police Investigation Intensifies in Palghar Case
Police Investigation Intensifies in Palghar Case
पालघर : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणात गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल्या शिवसेनेचे निलंबित जिल्हाप्रमुख कुंदन संखे, युवासेना प्रमुख साईराज पाटील, मनीष ऊर्फ विकी संखे, राहुल संखे, ऋषभ वारे, नगरसेवक नीलम संखे आणि मनोज घरत यांच्यासह आठ जणांनी अखेर रविवारी पालघर पोलिसांसमोर शरणागती (Palghar Relief Hospital Ruckus) पत्करली. पोलिसांनी त्यांना अटक करून पालघरच्या सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी योगेश गजभिये यांनी या आठ जणांसह यापूर्वी अटकेत असलेला राहुल घरत आणि अन्य आरोपी अशा एकूण २२ जणांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.