Pali Roads : ऐन दिवाळीत अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत खड्ड्यांसह धुरळ्याची आतषबाजी, अवजड वाहतुकीचा ताप; भाविक नागरिक व वाहन चालक त्रस्त

Potholes and Dust Plague Pali Roads, Affecting Devotees : प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडून दुचाकी घसरत असल्याने भाविक, नागरिक त्रस्त झाले असून, तात्पुरत्या डागडुजीमुळे धुरळा उडत असल्याने 'रोगापेक्षा इलाज भयंकर' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Potholes and Dust Cause Misery to Devotees and Locals

Potholes and Dust Cause Misery to Devotees and Locals

Sakal

Updated on

पाली : प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. तब्बल 2 ते 3 वेळा खडी व ग्रीट टाकून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले आहेत. मात्र अवजड व डंपर वाहतुकीमुळे पुन्हा खड्ड्यांनी डोकं वर काढले आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली खडी व ग्रीट बाहेर येऊन खूप मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. मोटारसायकल घसरून अपघात देखील होत आहेत. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयानक असे म्हणण्याची वेळ पालीकरांवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com