

Residents Demand Immediate Cancellation of Property Tax Hike
Sakal
पाली : पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन जवळपास चार वर्षे होत आली आहेत. मात्र अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यातच अवाजवी घरपट्टी वाढीच्या नोटीस नागरिकांना बजावल्याने नाराज नागरिकांचा उद्रेक वाढत आहे. अखेर शुक्रवारी (ता. 14) पाली नागरिक समस्या निवारण मंचाच्या वतीने ‘विकास नाही तर करवाढ नाही’ असा नारा देत नगरपंचायतीविरोधात मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे.