

Pali citizens protest against unfair tax hike
saskal
पाली : या बैठकीत संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाचा जोरदार निषेध करत, निवडून दिलेल्या नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव करून देणारे खरमरीत निवेदन सादर केले. या बैठकीत पाली - सुधागड संघर्ष संस्थेचे सदस्य व पालीतील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या निवेदनात कारवाढी संदर्भात शास्त्रशुद्ध लेखाजोखा आणि कशाप्रकारे करवाढ शास्त्रशुद्ध व कायदेशीर व नियोजित पद्धतीने होऊ शकते, आणि नागरिकांवरील बोजा कमी होऊ शकतो, याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच निवेदनात नगरसेवकांना ठणकावून नमूद करण्यात आले की, पालीतील नागरिकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, ही जबाबदारी आहे, सौभाग्य नव्हे.