
Eco Friendly Diwali
Sakal
पाली : तिमिरातून तेजाकडे नेणारा, नवी उर्जा, प्रकाश, आनंद, उत्साह, नवचेतना देणारा आणि विवेक जागृत ठेवणारा सण म्हणजे दिवाळी. या सणात सर्वचजण आनंद व प्रेम देत अन् घेत असतात. मात्र या आनंदावर बऱ्याचवेळा फटाक्यांच्या दुष्परिणामामुळे विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे टाळण्यासाठी मागील वीस वर्षांपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती फटाके मुक्त दिवाळी अभियान राबवित आहे. यंदाही हे अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. यासाठी पुस्तक वाटप, रिल्स बनवणे, समाज माध्यम व इंस्टाग्राम पोस्ट वर जनजागृती, पुस्तक स्टॉल, सेल्फी पॉईंट, पत्रके वाटप आदी उपक्रम राबविले जात आहेत.