Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pali Nagar Panchayat Tax Hike: रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथे प्रस्तावित घरपट्टी करवाढीविरोधात २ नोव्हेंबर २०२६ रोजी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे करवाढीपूर्वी नगरपंचायतीने मागील पाच वर्षांतील उत्पन्न, खर्च आणि विकासकामांचा हिशेब जाहीर करावा, अशी संघर्ष समितीची मागणी आहे..
Pali Sudhagad Struggle Committee members submit a memorandum to the local administration opposing the proposed property tax hike.

Pali Sudhagad Struggle Committee members submit a memorandum to the local administration opposing the proposed property tax hike.

esakal

Updated on: 

पाली: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील प्रलंबित नागरी समस्या आणि प्रस्तावित घरपट्टी करवाढी विरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाचा मनमानी कारभार आणि करवाढीचा बोजा लादण्याच्या निषेधार्थ येत्या २ नोव्हेंबर २०२६ रोजी पाली नगरपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. पाली सुधागड संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनासंदर्भात आज नगरपंचायत, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाला अधिकृत निवेदन देण्यात आले आहे.

Loading content, please wait...