

Pali Public Opposition Leads to Stay on Property Tax Hike
Sakal
पाली : मागील अनेक दिवसांपासून अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतने केलेल्या मालमत्ता कर वाढीविरोधात नागरिकांनी आंदोलन व निवेदन देऊन लोकचळवळ उभी केली होती. या अनुषंगाने पाली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. 20) नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. यासभेत नगरपंचायतने लोकभावना लक्षात घेऊन सर्वानुमते सन 2025-26 साठी केलेली करावाढ अखेर स्थगित केली आहे.या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची चर्चा करवाढीच्या प्रस्तावावर केंद्रित होती.