
Pali Police
Sakal
पाली : मुंबईचे रहिवासी प्रमोद गणपत देऊळकर यांना पोलिसांच्या कार्यतत्परतेचा सुखद अनुभव आला. बुधवारी (ता. 24) त्यांची जमीन खरेदीसाठी आणलेली चार लाख रुपये रोख रक्कम आणि बँकेचे महत्त्वाचे चेक असलेली बॅग हरवली होती. मात्र पाली पोलिसांनी ती अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढत प्रमोद देऊळकर यांना परत केली.