
पाली : अवघ्या दोन तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण पूर्ण झालेल्या वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या मार्गाच्या दुरावस्थेमुळे गणेश भक्तांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला आणि आता पुन्हा एकदा परतीचा प्रवासीही खड्ड्यातून होणार आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व निषेध करण्यासाठी सुधागड मनसेतर्फे सोमवारी (ता. 1) तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या नेतृत्वाखाली जांभूळपाडा येथील खड्ड्यात साठलेल्या पाण्यात होड्या सोडून अनोखे आंदोलन करण्यात आले.