

Delayed Monsoon Impacts Migratory Birds in Raigad
Sakal
पाली : परतीच्या पावसाचा फटका येथील पक्षांना आणि प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांना बसला आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. लांबलेला पाऊस व बदललेत्या ऋतुमानाचा अनेक पक्षांच्या जीवन चक्रावर परिणाम झाला आहे. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. त्यानुसार पावसामुळे पक्षांचे अन्नाचे स्रोत कमी झाले असल्याने पक्षांना अन्नासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात रोडावली आहे.