Raigad: जीवावर उदार होऊन मुक्या जीवाला जीवनदान!; पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्वानाची केली सुखरूप सुटका
Dog Rescued from Floodwaters in Pali: रायगड जिल्ह्यातील पाली येथे अंबा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्वानाला प्राणीमित्र अमित निंबाळकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढत जीवनदान दिले.
पाली: येथील अंबा नदी पुलाखाली पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका मुक्या कुत्र्याला प्राणीमित्र अमित निंबाळकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने पाण्यात उतरून सुरक्षित बाहेर काढत त्याला जीवनदान दिले.