Pali Stray Dogs: पालीत भटक्या कुत्र्यांचा कहर; १० वर्षांच्या चिमुरडीसह भाविक महिलेला चावा

पालीत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; चिमुरडीसह भाविक महिलेला चावा, नागरिकांमध्ये भीतीचे सावट
Rising Terror of Stray Dogs in Ashtavinayak Shrine Pali

Rising Terror of Stray Dogs in Ashtavinayak Shrine Pali

Sakal

Updated on

पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून नागरिक आणि भाविकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी (ता.15) तहसील कार्यालयासमोरील चौधरी यांच्या गोडाऊनसमोर अक्षरा बळीराम कंक (वय १०) या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिच्या पोटावर, मांडीवर आणि हातावर अशा तीन ठिकाणी गंभीर चावा घेतला. तसेच चार दिवसांपूर्वी एका ठाण्यातील भावी महिलेवर देखील कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com