

Pali Water Shortage Update Nagar Panchayat Starts KT Weir Work Early and Completes Two Small Dams on Amba River
esakal
-अमित गवळे
पाली: यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याच्या पार्श्वभूमीवर अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पाली नगरपंचायतीने अत्यंत सतर्कता दाखवत प्रभावी पावले उचलली आहेत. दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारी केटी बंधाऱ्यावर प्लेट लावण्याची प्रक्रिया यंदा ऑक्टोबर महिन्यातच युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबा नदीवर दोन लघु बंधाऱ्यांची उभारणीही यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.