कामाच पैसे मिळाल्यावर धान्य आणू ; आता गर्दीत गर्दी नको.. अस ती म्हणाली अन्

राजेश मोरे
बुधवार, 25 मार्च 2020

तिने मालकीणबाईला सहज विचारले. इतका बाजार आणि महिन्या अखेरला का आणला?

कोल्हापूर : आमचं हातावरच पोट, त्यात धुण्याभांड्याची चार कामंही कमी झाली. महिन्याच्या सात तारखेनंतर कामाचं पैस मिळाली की भरायचा बाजार... मालकीणबाईच्या प्रश्‍नावर धुणी-भांडी करणाऱ्या मावशी सहज बोलून गेली. तसं भरलेलं घर एकदम शांत झालं. कोरोनाचा प्रतिबंधासाठी 21 दिवस देश लॉकडाऊन केल्याची पंतप्रधानांनी जाहीर केले. तशी बाजारात अन्नधान्य खरेदीची झुंबड उडाली. गर्दी टाळण्याच्या उद्देशाला गालबोट लावण्याचा हा प्रकार जवळपास देशात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पहावयास मिळला. त्याला अशिक्षित मावशीने दिलेले झणझणीत उत्तर सुशिक्षितांना विचार करायला लावणारं होत. 

घरभाडे कसे द्यायचे? 

 

पुरूष माणसांचा आधार नसलेले शहरातील एक सामान्य कुटुंबातील एक महिला धुणी-भांडीची चार घरची कामे करते. त्यावर तिचे मुलगा, सासू असे तिघांचे कुटुंब चालते. कोरोनामुळे हातगाडीचे व्यवसाय बंद झाल्याने तिच्या हातची दोन कामेही बंद झाली. उरल्या सुरल्या कामावर घरभाडे कसे द्यायचे?, खायचे काय? मुलाच्या शिक्षणाचं काय? असे दिव्य प्रश्‍न तिच्या समोर उभे आहेत. पण त्याचा सामना तर कारायचाच या निर्धाराने तिचे कष्ट सुरू तिची नवे काम शोधण्याची धडपड सुरू आहे. 

 हेही वाचा- गड्या आपला गाव बरा म्हणत 40000 लोक दाखल ; 13 हजार कर्मचारी लढ्यासाठी सज्ज
दरम्यान मंगळवारी (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवस लॉक डाऊन केल्याचे जाहीर केले. तसे प्रत्येकाची अन्नधान्यापासून भाजीपाला खरेदीची घाई सुरू झाली. दिसेल त्या दुकानात नागरिकांनी गर्दी केली. गर्दीतून मिळेल त्या किमंतीला, मिळेल त्या दर्जाचे धान्यापासून साबण, भाजीपाला घरात आणून टाकला. अशाच एका कुटुंबात ही महिला आज सकाळी धुणी-भांड्याचे काम करायला गेली.

  हेही वाचा- गर्दी टाळण्यासाठी देवरुखने लढवली अशी युक्ती...

त्याचवेळी आणीनं दुकानातून बाजार

तिने घरात पसरलेला बाजार पाहीला. तिने मालकीणबाईला सहज विचारले. इतका बाजार आणि महिन्या अखेरला का आणला? यावर मालकीणबाईने "अगं तुला माहित नाही का? 21 दिवस सगळं बंद आहे. तू पण जाऊन बाजार आणं.' असे सुचविले. त्यावर त्या महिलेने मालकीणबाई आमच्यांकडं कुठलं पैसे. चार घरचीही कामं कमी झालीत. सात तारखेनंतर तुम्ही कामाचं पैसं द्याल, त्यावेळी आणीनं दुकानातून बाजार... असे सहज उत्तर दिले.

तिच्या या उत्तरातून 21 दिवस देश लॉकडाऊन करण्याचा हेतू सांगून गेला. जीवनावश्‍यक वस्तू उपलब्ध होणार आहेत. हातावरचे पोट असणारी धुणी भांडी करणाऱ्या या महिलेप्रमाणे शहरासह देशात लाखो जण आहेत. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका कोरोनाचा प्रतिबंध करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when we get work we bring grain washing aquarium in workar kolhapur marathi news