esakal | खवलोत्सव आहे तरी काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

Pangolin Festival In Degave Ratnagiri Marathi News

कोकणात सध्या खवलेमांजर या प्राण्याच्या चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले असून वेळोवेळी त्याच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत. असे असताना चिपळूण तालुक्‍यातील डुगवे गावातील ग्रामस्थ या प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी सरसावले.

खवलोत्सव आहे तरी काय ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - डुगवे गावातील खवले मांजराचे रक्षण करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी ग्रामदेवतेला साकडे घातले. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या पुढाकाराने डुगवे गावात खवलोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी खवले मांजराच्या नावाने चांगभलं म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले. पाचशेहून अधिक ग्रामस्थांनी या उत्सवात सहभाग घेतला होता. 

कोकणात सध्या खवलेमांजर या प्राण्याच्या चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले असून वेळोवेळी त्याच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत आहेत. असे असताना चिपळूण तालुक्‍यातील डुगवे गावातील ग्रामस्थ या प्राण्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी सरसावले. जनजागृतीसाठी खवले मांजर महोत्सव साजरा करण्यात आला. खवलोत्सवाची पालखी घराघरात फिरली. ग्रामस्थांनी भक्तीभावाने खवलेमांजराचे औक्षण केले. पालखी परत सहाणेवर बसली. तिथे खेळे, नमन सदर करण्यात आले. त्यात खवल्याचे सोंगसुद्धा आले.  

सर्व खवले मांजर प्रजातीचे रक्षण कर 

यावेळी ग्रामदेवतेला साकडे घालण्यात आले. "गावदेवी आमच्या गावात खवलेमांजर आहे. त्याचे रक्षण कर, त्यांची संख्या वाढव, तसेच तस्करी, चोरटा व्यापार यात अडकलेल्या लोकांना चांगली बुद्धी दे. जगातील सर्व खवले मांजर प्रजातीचे रक्षण कर', असे गाऱ्हाणे घालण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी खवले मांजराच्या रक्षणाची शपथ घेतली. 

loading image