"चांदा ते बांदा'चा जिल्ह्यात बट्ट्याबोळ - उपरकर

"चांदा ते बांदा'चा जिल्ह्यात बट्ट्याबोळ - उपरकर

सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे दिला. 

अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, ""मतांवर डोळा ठेवून दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी सिंधुदुर्गवासियांशी फसव्या घोषणा करून फसवणूक केली आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना जनताच उत्तर देईल. 

येथील पर्णकुटी विश्रामगृहावर श्री. उपरकर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, ओंकार कुडतरकर, परिवहन तालुकाध्यक्ष अतुल केसरकर आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या तोंडावर दिलेले बजेट हे भूलभुलैया करणारे आहे. कोकणी जनतेसाठी हा फसवा बजेट ठरणार आहे, अशी टिका श्री. उपरकर यांनी केली. 

""सावंतवाडीचे रामराजे पुण्यश्‍लोक बापूसाहेब महाराज स्मारक आणि मालवणी अभिनेते मच्छिंद्र कांबळी स्मारकांची गेल्यावेळी फक्त फसवी घोषणा झाली. त्याचे काहीही झालेले नाही. आता सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब शिवरामराजे भोसले स्मारकाची घोषणा केली आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता केवळ मतांची गोळा बेरीज करण्यासाठी शिवरामराजे भोसले आणि मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक जाहीर करुन अर्थराज्यमंत्री पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे.'' 

- परशुराम उपरकर

ते म्हणाले, ""जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ला आणि त्यांच्या एकमेव मंदिराची डागडुजी घोषणा झाल्या; मात्र प्रत्यक्षात काही झाले नाही. काजू बागायतदार हवालदिल झाला आहे. मोठी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातील योजना लागू होणाऱ्या नाहीत. या बजेटमधून राज्यातील जनतेला काही साध्य होणार नसून निवडणुका लक्षात घेऊन हा बजेट सादर झाला आहे. येथील रेल्वे टर्मिनसचा काय झाल, आरोद्यांत कांदळवन पार्कचे का झाले ? सत्ताधाऱ्यांना विकासाचे काही देणं घेणं लागले नाही. चांदा ते बांदा योजना, सेट टॉप बॉक्‍स, अम्युझमेंट पार्क, चष्मा कंपनी, फूड पार्क, मोनोरेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अशा विविध घोषणांचा यात समावेश होता; मात्र प्रत्यक्षात यातील एकही घोषणा ते पूर्ण करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

केवळ आकड्यांची घोषणा 
उपरकर म्हणाले, ""तिलारीचे पाणी तारकर्ली पर्यंत नेण्यासाठी मागच्या अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात 18 कोटी रुपये देण्यात आले. पुढे काम रखडले आहे. रौप्यमहोत्सवी वर्ष सांगून सिंधुदुर्गनगरीसाठी 25 कोटी जाहीर करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात ते पैसे आलेत नाही. त्यामुळे आता आकड्यांची घोषणा करणाऱ्या केसरकरांना जनताच उत्तर देईल.''  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com