शिवसेना संपवू पाहणाऱ्यांनाच सिंधुदुर्गात बढती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

कणकवली - खासदार नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी तन मन धन अर्पून शिवसेना पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रत्येक प्रयत्न नवनियुक्‍त जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी हाणून पाडला. त्यांनाच आता जिल्हाप्रमुख पदाची बढती दिल्याने सच्चे शिवसैनिक अडगळीत पडल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.

येथील मनसे संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पक्षवाढीसाठी प्रयत्न हाणून पाडल्याने अनेक शिवसैनिकांना जबर मार दिला. मालवण पोटनिवडणुकीत प्रचारासाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्या अडवल्या. त्यांनाच बढती देण्यात आली. २००५ नंतर शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले; पण त्या सर्व शिवसैनिकांना मार देण्यात पडते आघाडीवर होते.

वेंगुर्लेतील शिवसेनेच्या बैठक आटोपून जाणाऱ्या अजित सावंत आणि उमेश कोरगावकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मालवण पोटनिवडणुकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या जात होत्या. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गाडी कनेडी येथे अडविण्याचा प्रकार झाला होता. यातही श्री. पडते आघाडी होते; मात्र त्यांनाच आता जिल्हाप्रमुखपदी नियुक्‍ती मिळाल्याने अनेक सच्च्या शिवसैनिकांना प्रचंड वेदना झाल्या आहेत.

सच्च्या शिवसैनिकांना संधी नाही

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सिंधुदुर्गात वाढवू पाहणाऱ्या सच्च्या शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीच संधी दिलेली नाही. तर अन्य पक्षातून आलेल्यांना नेहमीच संधी मिळाली आहे. अशा व्यथा जुने शिवसैनिक मांडत असल्याचेही उपरकर म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parshuram Uparkar comment