कौतुकच : दहावीत शिकणाऱ्या पार्थची "निसर्ग शास्त्रज्ञ' म्हणून निवड; खारफुटीवर  करणार संशोधन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 February 2021

दिल्ली येथून पार्थ याची निवड झाल्याचे नुकतेच कळविण्यात आले. महाराष्ट्र राज्यातून या उपक्रमात फक्त 4 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पार्थ एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

तळेरे (सिंधुदुर्ग)  : भारत सरकारच्या हरित सेनेच्यावतीने निवडण्यात आलेल्या देशपातळीवरील 45 विद्यार्थ्यांमध्ये मुटाट (ता. देवगड) हायस्कूलच्या दहावीतील पार्थ परांजपे याची भविष्यातील 'निसर्ग शास्त्रज्ञ' म्हणून राष्ट्रीय स्तरावर निवड केली आहे. 

भारत सरकार व निकॉन कंपनीसोबत भागीदारीमध्ये असलेल्या एनटी या प्रकल्पाचा मुख्य उद्देश स्थानिक वनस्पती व जीवशास्त्र याविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील संभाव्य निसर्ग शास्त्रज्ञ म्हणून सक्षम बनवणे. त्यासाठी सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने संपूर्ण भारतभर सर्व घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 45 विद्यार्थ्यांचा शोध घेतला गेला आहे. यासाठी दिल्ली येथून अशा संशोधक मुलांची ऑनलाईन मुलाखत जानेवारीत घेतली होती. मुलाखतीसाठी भूतकाळ व भविष्यातील वाटचाल याविषयी तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली होती. पार्थ याने कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये धोक्‍यात असणाऱ्या 'खारफुटीच्या वनस्पतीसाठी' प्राधान्यक्रम दिला होता. 

हेही वाचा- चार पक्ष बदलणाऱ्या तेलींना स्वाभिमान शोभत नाही : रूपेश राऊळ  

मुटाट हायस्कूलचा विद्यार्थी : 'खारफुटी वनस्पतीवर करणार संशोधन ​

दिल्ली येथून पार्थ याची निवड झाल्याचे नुकतेच कळविण्यात आले. महाराष्ट्र राज्यातून या उपक्रमात फक्त 4 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पार्थ एकमेव विद्यार्थी ठरला आहे. या मुलाखतीसाठी विद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेनेचे उपक्रमशील शिक्षक अनिल घुगे यांनी विभागीय वन अधिकारी सिंधुदुर्गचे  बागडे, मुंबई येथील डब्ल्यूडब्ल्यूएफचे शिक्षण अधिकारी स्वानंद गावडे तसेच वनक्षेत्रपाल सोनवडेकर, वनपाल प्रकाश तळेकर व तळेरे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार्थची तयारी करून घेतली होती. त्याने ग्रामीण भागातून मिळविलेले यश निश्‍चितच कौतुकास्पद आहे. 

हेही वाचा- जे दिशा बरोबर झाले..तेच पुजा बरोबर होणार असेल..तर तो -

या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे. यासाठी त्याला भारत सरकार व निकॉन कंपनीच्यावतीने टॅब, उच्च दर्जाची दुर्बीण व अन्य साहित्य दिले जाणार आहे. यासाठी मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विश्‍वासराव पाळेकर, सुभाषचंद्र परांजपे, शिवाजी राणे, जितेंद्र साळुंखे, डॉ. केळकर, रघुनाथ पाळेकर, श्रीकृष्ण सोवनी, भास्कर पाळेकर व शाळेचे मुख्याध्यापक घरपणकर, कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

संपादन- अर्चना बनगे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parth Paranjape selected Nature Scientists of the future kokan education marathi news