घाबरू नका ;ओरोसमध्ये मृत्यु झालेला तो रुग्ण कोरोनाबाधित नाही.....

The patient  died in the Oros is not coronally affected kokan marathi news
The patient died in the Oros is not coronally affected kokan marathi news
Updated on: 

ओरोस (सिंधुदुर्ग) : कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा आयसोलेशन कक्षामध्ये उपचार घेत असताना शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यु झाला. त्यांचा एखाद्या जुनाट आजाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, आपल्याकडे कोरोनाचा रुग्ण रुग्ण नसल्याने कोणीही घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 जिल्ह्यात २६ मार्च नंतर कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळला नाही. एकमेव आढळलेल्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला ९ एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्याच्या घडीला ओरोस येथील आयसोलेशन कक्षात ५२ जनांना दाखल करून ठेवले आहे. त्यांच्यावर योग्य पध्दतीने उपचार सुरू आहेत. शुक्रवारी या वॉर्डमधील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण १५ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.

त्याला सर्दी, ताप यासारखी लक्षण दिसून आल्याने त्याला आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्याचा नमूना सुद्धा तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आला होता. मात्र सुदैवाने कोरोना रिपोर्ट ही निगेटीव्ह आला होता. मात्र शुक्रवारी त्या रुग्णाची प्रकृती खालवत गेल्याने त्याचा मृत्यू झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या रुग्णाचा एखाद्या जुनाट आजारा मुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. आयसोलेशन वॉर्डात दाखल झाल्यापासून त्याची प्रकृती ही चिंताजनक होती. याचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com