esakal | पेढे, परशुरामचा तिढा सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

पेढे, परशुरामचा तिढा सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.तेव्हा त्यानी ही ग्वाही दिली.

पेढे, परशुरामचा तिढा सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.तेव्हा त्यानी ही ग्वाही दिली.

पेढे, परशुराम येथील देवस्थान व कुळातील वादामुळे नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली आहे. स्थानिक प्रशासनाने भरपाई वाटपाचा 90 व 10 टक्के असा प्रस्ताव शासनाकडे दिला. मात्र त्यावर तोडगा निघत नाही. यापूर्वीही पेढे परशुरामची संघर्ष समितीने शेखर निकमांच्या साथीने शरद पवारांची भेट घेतली होती.

त्यावेळी तहसीलदारांकडे जमिनींच्या मालकीबाबत फेर प्रस्ताव सादर करण्याची सूचना पवारांनी केली होती. त्यांनी महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील, यांच्यासह मुख्यमंत्र्याशी संवादही साधला होता. मात्र त्यापुढील प्रक्रियेला गेल्या काही महिन्यात चालना मिळालेली नाही. स्थानिक प्रशासन तसेच मंत्रालयीन स्तरावर अपेक्षित हालचालीही सुरू नाहीत. आता लोकसभा निवडणुका संपल्याने पुन्हा त्यास गती मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना साकडे घातले. पेढे परशुराम विषयी सरकार तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. 

संघर्ष समितीत उभी फूट 
आमदार चव्हाण, खासदार राऊत यांच्या माध्यमातून शिवसेनेचे पदाधिकारी मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. संघर्ष समितीत उभी फूट पडली. सेना भाजपच्या कार्यकर्त्यानी नव्या कृती समितीची मुहुर्तमेढ रोवली. कृती समितीतर्फे त्यांनीही पाठपुराव्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन-दोन समित्या स्थापन झाल्या असल्या तरी ध्येय एकच असल्याचा दावा संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्‍वास सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

loading image