पेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते
रोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर सीएफमध्ये करार होणार असून, या करारानंतर पेण अलिबाग या मार्गाचा प्रश्न मार्गी लागेल व या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारीमध्ये करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.

रोहा स्थानकापासून रोहा पनवेल दिवा या मेमू सेवेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ रोहा पेण या विद्युतीकरण झालेल्या मार्गाचे उद्घाटन व रोहा हरित स्थानकाचे लोकार्पण अनंत गीते यांच्या शुभहस्ते व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्याप्रसंगी गीते बोलत होते.
रोहे शहरासाठी हा सुवर्ण क्षण असून, आजच्या या कार्यक्रमामुळे रोहेकरांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे मत व्यक्त करून ही रोहा मुंबई लोकल सेवा सुरू होण्याची नांदी असल्याचे अनंत गीते यांनी सांगितले. विद्युतीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढवणे शक्य असून, रोहा मुंबई अंतर दीड तासांत कापणे शक्य होणार असल्याचेही गीते म्हणाले.
रोहा दिवा ही डिझेलची गाडी आता इलेक्टिकवर चालेल, एवढाच बदल या निमित्ताने झाला असून, रोजच्या सकाळ व दुपारच्या फेऱ्याही कायम आहेत. नवी फेरी एकही नसून आधीचेच वेळापत्रक कायम राहिल असे मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक एन पी सिंग यांनी सांगितले.
तसेच रोहा पेण आपटा ही तिन्ही स्थानके हरित स्थानके होत असल्याचे सांगितले. आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते सुरेद्र म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, तालुका समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, जिल्हा भाजयुमो अध्यक्ष अमित घाग, तालुका प्रमुख लमीर शेडगे, राजीव साबळे, महेंद्र दळवी, नरेश गावंड, भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.